नगर, (दि.09 ऑक्टोबर) : नगर शहर शिवसेनेमध्ये अनेक दिवसांपासून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु होते. यांच्यातील समजूत काढण्यासाठी दि. ८ ऑक्टोबर रोजी कोहिनूर मंगल कार्यालय येथे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची सभा शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
या सभेमध्ये गटबाजी रोखण्यात संपर्कप्रमुख यांनी त्यांची चतुराई वापरली आणि या गटबाजीला कायमचा पूर्णविराम मिळाला. त्यामुळे आता शिवसैनिक यांच्यामध्ये आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे. व्यक्ति निष्ठेपेक्षा संघटना निष्ठा जाणली पाहिजे. व्यक्ति पूजा करण्यापेक्षा भगव्यचा तेज राखण्यासाठी भेदभाव विसरून मनातील जळमट काढून टाकावी व कोणीही स्वहितासाठी संघटनेला बदनाम करू नये.
तसेच नगर मध्ये घडणाऱ्या सोशल मीडिया तसेच वृत्तपत्र या हालचालींवर शिवसेना भवन येथून एक टीम कार्यरत होऊन लक्ष घालणार आहे, असे पक्ष सचिव यांच्या सोबत बोलणी झाली आहे. त्यामुळे कोणीही आक्षेपार्ह पोस्ट अथवा बातम्या दिल्यास त्यांच्यावर थेट कडक कारवाई होणार असल्याचा इशारा जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुख यांनी दिला.
तसेच वर्तमान पत्रांच्या संपादकांना ही विनंती केली की शिवसेने संदर्भात कुठलीही बातमी आल्यास त्याची खात्री करुन नावाणीशीर बातमी छापावी असे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी नमूद केले सामना या वृत्तपत्र मधून नगर शहरासाठी जाहीर झालेले पदाधिकारी हे वैध आहेत. इतर सर्व पदाधिकारी हे अवैध आहेत. त्यांनी कुठेही त्यांच्या पदाचा वापर करू नये असा इशारा ही संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख व शहरप्रमुख यांनी केला आहे.
स्वर्गीय अनिल भैय्या यांनी जोमाने उभारलेली शिवसेना तुम्हा आम्हला अधिक मजबूत करायची आहे.आपले पक्षप्रमुख सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. नगर विकासासाठी आपल्याला त्यांच्याकडून अधिकाधिक फायदा कसा करुन घेता येईल, यासाठी एकजुटीने प्रयत्न करावे पुढील आठवड्यात १८ ऑक्टोबर रोजी नगर शहरात नक्षत्र लॉन येथे सभासद नोंदणीची मिटिंग होऊन कार्य सुरु होणार आहे.
त्यासाठी सुद्धा अधिक जोमाने प्रयत्न करावे, संघटने साठी काम करत असताना कुठल्याही प्रकारच्या अडी अडचणी आल्यास नामदार शंकरराव गडाख, संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर व जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे खंबीर पणे संघटनेच्या पाठीशी उभे आहेत असे त्यांनी सांगितले.
या वेळी विक्रम राठोड, अंबादास पंधाडे, संजय शेंडगे, संभाजी कदम, गणेश कवड़े, अनिल बोरुडे, अनिल शिंदे, दत्ता कावरे, दत्ता जाधव, विजय पठारे, मदन आढाव, संग्राम शेळके, अरुण गोयल, आशा निंबाळक, स्मिता अष्टेकर रवि वाकळे, अभिषेक कळमकर, भगवान फुलसौंदर, अशोक दहिफळे, बाळासाहेब बोराटे, सुभाष लोंढे, योगिराज गाडे, शाम नळकांडे, गिरीश जाधव, रमेश परतानी व सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.