चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारास लुटले


नगर, (दि.09 ऑक्टोबर) : चार अनोळखी इसमांनी मोटारसायकलस्वारास अडवून चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील 29 हजार 60 रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने, मोबाईल व रोख रक्कम असा ऐवज बळजबरीने लुटून नेला. 

 

ही घटना शेवगाव ते बोधेगाव जाणार्‍या रोडवर नजीक बाभुळगाव फाट्यावर घडली. याबाबतची बुधवारी (दि.7) सायंकाळी साडेसात वाजल्याच्या सुमारास गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

 

याप्रकरणी रविंद्र संपत खलाटे (रा.दौंड) यांच्या फिर्यादीवरुन शेवगाव पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गोरे हे करीत आहेत.

 

सध्या गाडी थांबवून लुटण्याचा प्रमाणात वाढ होत चालली आहे. महामार्गावरही आता पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरीकांमधून होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post