शहरातील काही भागात शनिवारी देखभाल दुरुस्तीसाठी विजपुरवठा खंडीत राहणार


नगर, (दि.09 ऑक्टोबर) : महावितरणच्या अहमदनगर शहर तथा ग्रामीण विभाग अंतर्गत येणार्‍या काही भागातील वीजपुरवठा देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी शनिवार दि. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते  5 या वेळेत बंद राहणार आहे. ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.


यामध्ये  सावेडी परिसर, गुलमोहर रोड, प्रोफेसर चौक, बोल्हेगाव, नव नागापूर, मनमाड रोड व परिसर, नेप्ती, केडगाव, भिंगार, वडारवाडी, खारे खर्जुने, पाईपलाईन रोड व परिसर, औरंगाबाद बायपास परिसर, निमब्लक, अहमदनगर एमआयडीसी, स्वस्तिक चौक, मल्हार चौक, कायनेटिक चौक, आगरकर मळा, महादेव मळा, रेल्वे स्टेशन, कोठी, शिवाजी हौसिंग सोसायटी, स्टेशन रोड, इम्पेरिअल चौक, बुरुडगाव रोड, बस स्थानक, टाकळीढोकेश्‍वर,खांडकी, पळशी, वनकुटे धोत्रे बु धोत्रे खु., वासुंदे,


मांडवे खु. तसेच 132/11 के.व्ही नगरएमआयडीसी व 33/11 के.व्ही वडझिरे, लोणीमावळा, अळकुटी, निघोज, पिंपळगाव रोठा उपकेंद्रातून निघणार्‍या सर्व विद्युत वाहिन्या व त्यावरील असलेला परिसराचा वीजपुरवठा सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजता या वेळेत या वाहिन्यांवर कंपनीला देखभाल व दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने  बंद राहणार आहे. या भागातील नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या शहर  तथा ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post