नगर, (दि.03 ऑक्टोबर) : गाडी धुताना सांडणार्या पाण्याने घरासमोर चिखल होतो, असे म्हटल्याचा राग आल्याने लाकडी दांडक्याने मारहाण केली.
तसेच अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न करून दगडाने मारहाण केल्याची घटना बुरूडगाव येथील समर्थनगर येथे घडली.
सागर रमेश राऊत हा त्याची चारचाकी गाडी धुताना त्याला मनोज राऊत याच्या भावाने आमच्याकडे चिखल होतो, असे म्हटले याचा राग येऊन सागर राऊत याने लाकडी दांडक्याने मारहाण केली.
तसेच मनोज राऊत यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून त्याला दगडाने मारहाण केली.
या प्रकरणी मनोज राऊत याने दिलेल्या ङ्गिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस नाईक सिनारे हे करीत आहेत.
