नगर, (दि.03 ऑक्टोबर) : नगर शहर विभागाचे उपपोलिस अधिक्षक संदिप मिटके यांचा झी 24 तास वृत्तवाहिनीतर्फे महाराष्ट्राची शान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कोराना आजार नियंत्रीत ठेवण्यकरीता महाराष्ट्र राज्यात संचारबंदी लागु करण्यात आल्यापासुन एक सामाजिक बांधिलकी व आपण समाजाचे एक देणे लागतो या भावनेतुन पोलीस दलात काम करणारे एक समाजसेवक व कर्तव्यदक्ष डीवायएसपी नगर शहर अधिकारी संदिप मिटके
यांनी कोरोना या संसर्ग जन्य आजाराचा नगर शहरात प्रादुर्भाव वाढत असतांना नगर शहर व परिसरात विविध समाजसेवी संघटनांच्या मदतीने गरवंतांना सुमारे 7,36,112 अन्नपाकिटे व 7,660 गरजवंत कुटुंबीयांना किराणा किट वाटप केले. तसेच महिलांना सखी किट वाटप, हॉटस्पॉट व कंटेनमेंन्ट झोन मधील मुक्या प्राण्यांना चारा वाटप केला.
विदयार्थांना शालेय साहित्य वाटप केले. सर्व धर्मांच्या बांधवांना कोरोना काळात संचारबंदी व प्रशासनाकडुन घालण्यात आलेल्या निर्बधामुळे घरात सण साजरे करावे लागत असल्याने त्यांच्यात गोडवा निर्माण करण्याचे उददेशाने गोड अन्न पदार्थांचे वाटप केले.

9 ट्रेन मधुन विविध राज्यांमध्ये 10,499 प्रवाशी व 212 बस मधुन 4,081 प्रवाशांना अन्न पाकीटे देवुन त्यांचा प्रवास सुखकर केला. तसेच कर्नाटहुन राजस्थान येथे 62 बस मधुन प्रवास करणार्या परप्रांतिय मजुर व विदयार्थींना पाणी फळे व इतर खादय पदार्थ पोहच केले.
726 सोन्याचे व्यापारी, कारागिरांना 20 मे 2020 रोजी रात्री 12 वाजता अन्न पाकीटे व पाणी वाटप केले. सन 2020 श्री.गणेश उत्सव विसर्जन दरम्यान नगर शहर पोलीसांचे वतीने विसर्जन रथ ही संकल्पना मांडुन पोलीस शासकीय वाहनातुन श्री.गणेश मुर्तींचे संकलन करुन विसर्जन केले.

अशा प्रकारे पोलीस दलातील आपले कर्तव्य व समाजाप्रती असणारे आत्मयीता याचा मेळ राखत पोलीस दलातील एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणुन अहमदनगर शहर आपल्या कार्यातुन प्रतिमा तयार केली.
संदिप मिटके, हे करत असलेल्या कार्याची राज्यपातळीवर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेवुन त्यांचे कार्याचा गौरव केला. तसेच दि.02 ऑक्टोबर 2020 रोजी झी 24 या वृत्त वाहिनेने देखील त्याच्या कामाची दखल घेवुन महाराष्ट्राची शान गौरव सोहळा या कार्यक्रमात
गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवालए मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग, नाशिकचे पोलिस आयुक्त दिपक पान्डये यांचे उपस्थितीत नगर शहर विभागाचे डीवायएसपी संदिप मिटके यांना यांना महाराष्ट्राची शान या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तसेच कोविडयोद्धा म्हणून गौरव करताना झी 24 तास ला अभिमान वाटतोय असे गौरवोद्गार काढले.
संदिप मिटके यांचा झालेल्या सन्मानाबाबत अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्यासह नगर जिल्हयातील सामाजिक, सांस्कृतीक, शैक्षणिक, अधिकारी यासह नगरकरांकडून मिटके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.