बिहारमधील 38 जिल्ह्यांसाठी देशभरातून विविध राज्यातील प्रमुख पदाधिकार्यांची निरीक्षक म्हणून निवड करण्याात आली असून, राज्यातून देशमुख यांच्यासह राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, मा. खा. नामदेव उसेंडी, राजाराम पानगव्हाणे, सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या सूचनेनुसार या सर्व पदाधिकार्यांना मंगळवारी दि. 20 रोजी पाटणा येथील बिहार प्रदेश काँग्रस कमिटीच्या कार्यालयात पोहोचण्याबाबत कळविले आहे. सदाकत आश्रम येथे होणार्या बैठकीत कामांचे वाटप करण्याात येणार असून, त्यानंतर विविध जिल्ह्यात पदाधिकारी रवाना होणार आहेत.
या नियुक्तीबाबत बोलताना देशमुख म्हणाले, की प्रदेश सरचिटणीस या नात्याने राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यात मी काम केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मला प्रथमच मिळाली आहे. या नियुक्तीबद्दल देशमुख यांचे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, खा. राहुल गांधी, खा. रणदीप सुरजेवाला, मोहन प्रकाश यांचे आभार मानले आहे.
