लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल : आ.संग्राम जगताप

 देहरे येथील पाईपलाईन जोडणीचे काम अंतिम टप्प्यात


नगर, (दि.09 ऑक्टोबर) : देहरे गावासाठी मनमाड राज्य महामार्गाखालून भुयारी मार्ग काढण्यासाठी बांधकाम विभागाच्यावतीने कामाला सुरुवात केली. परंतु अहमदनगर महानगरपालिकेच्या मुळाधरण ते विळद पंपींग स्टेशनपर्यंत येणाऱ्या ११00 पीएसएसी पाईपलाईन व ७0०0 सीआय पाईपलाईनचा भुयारी मार्ग तयार करण्यास अडथळा निर्माण होत असल्यामुळे बांधकाम विभागाच्यावतीने पाईपलाईन स्थलांतरीत करण्यासाठी महापालिकेकडे पत्रव्यवहार सुरु केला.

४१0 मीटरची लाईन स्थलांतरित पोटी १ कोटी ६0 लाख रूपये वर्गही केले. पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले असून आज जोडणीचे काम उद्या मध्यरात्रीपर्यंत पूर्ण होऊन नगर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होऊन टप्प्याटप्प्याने सर्व भागात पाणीपुरवठा सुरळित होईल, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

देहरे येथे स्थलांतरित पाईपलाईन जोडणीच्या कामाची पाहणी करताना आ. संग्राम जगताप. समवेत इंजि. रोहिदास सातपुते, इंजि. महादेव काकडे, इंजि. गणेश गाडळकर, इंजि. एस. टी. रोहोकले, सामाजिक कार्यकर्ते उबेद शेख, संजय झिंजे, वैभव ढाकणे, माऊली जाधव, विजय सुंबे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना रोहिदास सातपुते म्हणाले की, अहमदनगर महानगरपालिकेच्या दोन लाईन देहरे गावातून मनमाड महामार्गावरुन जात असल्याने गावचा भुयारी मार्गामध्ये अडथळा निर्माण होत होता. अनेक दिवसांपासून हे काम प्रलंबित होते. ४१0 मीटरची पाईपलाईन टाकून झाली असून, आज जोडणीचे काम बाकी होते. तांत्रिक अडचण न आल्यास उद्या मध्यरात्रीपर्यंत पूर्ण होऊन शहराचा पाणीपुरवठा सुरळित होईल. पुढील काही दिवसात सर्व भागात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा नियमित होईल असा विश्‍वास व्यक्त केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post