सावेडीमधील मेघराज कॉलनीत घरफोडी


नगर, (दि.03 ऑक्टोबर) : सावेडी येथील सहकार नगर, मेघराज कॉलनीत घराचे कुलुप तोडून 5 हजार रुपयांची रोख  रक्कम चोरट्यांनी चोरुन नेली आहे.


माहिती अशी की, दि.29 सप्टेंबर ते दि.02 ऑक्टोबर दरम्यान,  डॉ.निधी अरुण कंदोई (वय 26,मुळ राहणार जुहु जेव्हीपीडी 4004, 9 पारला वेस्ट मुंबई, हल्ली रा.सहकार नगर, मेघराज कॉलनी, सावेडी ,नगर) या काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या असताना त्यांच्या बंद घराचे मुख्य दरवाजाचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन बेडमधील भिंतीमधील कपाट उघडून पर्समधील पाच हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यानी चोरुन नेली आहे.
 

याघटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक मुलानी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. डॉ.निधी अरुण कंदोरे यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात भा.दं.वि.क. 454, 457, 380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केली असून या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक आव्हाड हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post