हाथरस प्रकरणातील नराधमांना फासावर चढवा : अण्णा हजारे


नगर, (दि.03 ऑक्टोबर) :  उत्तरप्रदेशातील हाथरस गावात तरुणीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्याचा प्रकार मानवतेला लागलेला कलंक आहे.  ही  केवळ  या  तरुणीची  हत्या  नसून  मानवतेची  हत्या  आहे.  या  घटनेतील  आरोपींना  फासावर  चढवावे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले. 

 

गुरूवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आपल्या देशाची संस्कृती जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. ऋषीमुनींचा देश म्हणून भारत ओळखला जातो. देशात तरुणींवर, महिलांवर अत्याचार होतात ही बाब शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. ज्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, ते ती पार पाडण्यात कमी पडतात, ही चिंताजनक बाब आहे.

Post a Comment

Previous Post Next Post