विद्युत रोहित्र हलविण्यासाठी ‘महावितरण’समोर निदर्शने!

 
नगर, (दि.22 ऑक्टोबर) : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधील खाटीक गल्ली येथील विद्युत रोहित्र ( डी पी ) दुसरीकडे हलविण्यात यावे, या मागणीसाठी महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, महावितरणचे अधीक्षक अभियंता यांनी याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्‍वासन देण्यात आले.


कदम म्हणाले की, हा परिसर खूप गजबजलेला असतो. या रोहित्राजवळ या भागातील जेष्ठ नागरिक, लहान लहान मुले आदी तसेच येणारे जाणारे नागरिक आदींचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो. यावेळी एखादा अपघातसुद्धा घडू शकतो. त्यासाठी डीपी दुसरीकडे हलविणे गरजेचे बनले आहे.


अभियंता म्हणाले की, लवकर या ठिकाणची पाहाणी करण्यासाठी या भागाचे अभियंते पाठवून हा प्रश्‍न मार्गी लावू असे सांगिलते. यावेळी नगरसेवक दत्ता कावरे, दीपक खैरे, अप्पू बेद्रे, साहिर शेख, अब्दुल भाई, राहणं वस्ताद, आसिफ भाई, इजाज अबास अली, सुजाज अन्वर वस्ताद, उबेद अली, अल्ताफ हाजी आदी या भागातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post