मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय


मुंबई,  (दि.07 ऑक्टोबर) : राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत कृषिपंप शेतकऱ्यांना दिलासा देण्यासह इतर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांमध्ये हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी (आदरातिथ्य) परवान्यांची संख्या कमी करून ईझ ऑफ डुइंग बिझिनेसची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे.


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे :

* ग्रामीण भागातील लाखो कुटुंबियांना दारिद्र्य रेषेवर आणणाऱ्या नव तेजस्विनी-महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाला गती देणार. 523 कोटी रुपये निधी उभारणार. आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीमार्फत सहाय्य


* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे कुलगुरु व प्र-कुलगुरु या वैधानिक पदावर नियुक्त अधिका-यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या धर्तीवर ७ व्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय.


* कृषिपंप शेतकऱ्यांना दिलासा. उच्चदाब वितरण प्रणाली योजना राबविण्यासाठी एशिएन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय.


* हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी ( आदरातिथ्य) परवान्यांची संख्या कमी करून ईझ ऑफ डुइंग बिझिनेसची प्रभावी अंमलबजावणी

Post a Comment

Previous Post Next Post