येत्या अधिवेशनात महिला सुरक्षेसाठी ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय


मुंबई,  (दि.07 ऑक्टोबर) :  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येत्या अधिवेशनात राज्यातील माता भगिनींसाठी सुरक्षेचे मोठे कवच निर्माण करणारा ‘दिशा’ कायदा संमत करून घेणार अशी ग्वाही दिली आहे. 
 
 
अनिल देशमुख सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित दिशा कायदा अंमलबजावणी तसेच महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या संदर्भात बैठकीत बोलत होते.

 

अनिल देशमुख याबाबत म्हणाले की, माता भगिनींसाठी दिशा कायद्यांतर्गत मोठे सुरक्षा कवच निर्माण करण्यात येत असून यासंदर्भातील मसूदा अंतिम झाला असून माता-भगिनी तसेच तज्ञांकडून याबाबत अधिक सूचना देऊन त्याचाही अंतर्भाव यात करण्याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करून येत्या अधिवेशनात हा कायदा संमत करून घेतला जाईल, 

 

या बैठकीत सर्व प्रकारच्या चांगल्या सूचना आलेल्या आहेत त्याची नोंद घेवून हा कायदा अधिक चांगल्या पद्धतीने कसा करता येईल याचा विचार शासन करत असल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले. 

 

स्काईपद्वारे या बैठकीत सहभाग नोंदवत विधान परिषद उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हे तसेच चारूलता टोकस यांनी आपल्या सूचना मांडल्या. उपस्थित महिला प्रतिनिधीनींही सहभाग घेवून महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या.

Post a Comment

Previous Post Next Post