एक महिन्यानंतर रिया चक्रवर्तीला उच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

मुंबई,  (दि.07 ऑक्टोबर) : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पुरत्या अडकलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर जामीन मंजूर झाला आहे. 

 

मात्र, शौविक चक्रवर्ती आणि परिवार यांचा जामीन अर्ज न्यायलयाने फेटाळला आहे. सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर रिया चक्रवर्तीला 8 सप्टेंबर रोजी भायखळा तुरुंगात तिची रवानगी करण्यात आली होती.

 

दरम्यान, रियाला 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला असून पुढील 10 दिवस 11 ते 5 या वेळेत रियाला जवळील पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी रिया आणि शौविक यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने दोघांचाही जामीन अर्ज फेटाळला. या आधीही न्यायालयाने दोन वेळा रियाचा जामीन अर्ज फेटाळला होता.

Post a Comment

Previous Post Next Post