माहिती मिळाल्यावर पोलिसांनी या ठिकाणी जावून पाहणी केली. मात्र, याबाबत मिरजगाव पोलिस दुरक्षेत्रासह कर्जत पोलिस अनभिज्ञ होते. या गाडीला नंबर प्लेट नसून मागे फक्त सरकार नाव आहे.
यात काय माल होता,हा ट्रक नेमका कोठे चालला होता, ट्रकाला आग कशाने लागली असे प्रश्न असले तरी अद्यापही हे प्रश्न गुलदस्त्यातच आहेत. हा ट्रक पेटवला की पेटला, हा अपघात की घातपात याचा उलगडा पोलिस करतीलच.
नगर- सोलापूर मार्गावरील नागलवाडी गावाच्या शिवारात निमगाव गांगर्डेसह 17 गावांना पाणीपुरवठा योजनेसाठी असणार्या रिकाम्या पाण्याच्या टाकीपासून साधारणतः शंभर मीटरवर मालवाहतूक ट्रक जळालेल्या अवस्थेत आढळली.
ही ट्रक जळत असताना तेथे चालक व कोणीच नव्हते. सदर गाडी जाळून खाक झाली आहे. ट्रकजवळ एक स्टिलचा हंडा, बादली होती. या ट्रकमध्ये नेमके काय होते. याबाबत अद्याप काहीच माहिती मिळालेली नाही.
