नगर, (दि.03 ऑक्टोबर) : सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासुन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती ही महाडीबीटी या नव्याने विकसीत संकेतस्थळावरुन राबविली जाते. सदर संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज भरुन मंजुरीअंती देयके तयार झाल्यानंर रक्कम पूल अकाऊंट वर वर्ग करण्यात येऊन तेथुन ती संबंधीत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खाती जमा केली जाते.
सद्स्थितीत मोठ्या प्रमाणावर रक्कम या पूल अकाऊंटवर शिल्लक असून वितरीत करणेकामी महाडीबीटी प्रणालीमार्फत या कार्यालयास प्राप्त झालेला एक्सेल डाटा महाविद्यालयांना त्यांच्या ई-मेलवर पाठविण्यात आला आहे.
त्याअनुषंगाने महाविद्यालयांनी आपल्याकडील प्रवेशीत विद्यार्थ्यांचा डाटा फिल्टर करून प्रलंबित विद्यार्थ्यांना प्रलंबिततेबाबत जे कारण दाखविण्यात आले आहे, त्यानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी. जेणेकरुन विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासुन वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन समाजकल्याण उपायुक्त, अहमदनगर यांनी केले आहे.
