हरिष खेडकर, रऊफ शेख यांना राष्ट्रपती पदक

नगर (दि.15 ऑगस्ट ) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे येथील पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर व पोलिस अधीक्षक कार्यालयातील वाचक शाखेतील सहायक पोलिस उपनिरीक्षक रऊफ शेख यांना मानाचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

खेडकर हे मूळचे श्रीगोंदा येथील रहिवाशी असून, त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण श्रीगोंदा येथे  झाले  आहे. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयात झालेले आहे. खेडकर हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 1992 मध्ये पोलिस दलात उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. 

त्यांनी लोहमार्ग नागपूर, जालना, विशेष सुरक्षा शाखा-पुणे, सातारा बुलडाणा, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे, बीड, स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद, औरंगाबाद ग्रामीण आदी ठिकाणी सेवा केली. सातारा जिल्ह्यातील कराड वाहतूक शाखा, उब्रंज पोलिस ठाणे, पाटण पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद येथील कारकिर्द विशेष उल्लेखनिय राहिली आहे. त्यांना आतापर्यंत 431 बक्षिसे व 45 प्रसंशापत्रे मिळाली आहेत.

राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल खेडकर यांचे लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक नीलेश सोनवणे, तसेच खेडकर व शेख यांचे जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post