नगर (दि.13 ऑगस्ट ) : येथील तारकपूर परिसरातील सिंधी कॉनीतील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यानी घरातील 70 हजारांचे दागिने लांबविल्याची घटना घडली.
याप्रकरणी रोशन सुरिन्दर आहूजा (रा. यशवंत कॉलनी) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आहुजा हे त्यांच्या आई वडिलांकडे गेले असता, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलुप तोडून घरातील कपाटीची व इतर व वस्तुंची उचकापाचक केली. तसेच घरातील 70 हजार रुपयांचे दागिनी चोरुन नेले असे आहुजा यांनी म्हंटले आहे.
सहाय्यक पोलिस निरिक्षक किरण सुसरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास पोलिस नाईक गाडिलकर हे करत आहे.
Tags:
Crime
