अन्यथा शिवसेना आयुक्तांच्या
कार्यालयात उपोषण करणार : इशारा
नगर, (दि.27) : घनकचर्यातील भ्रष्टाचाराची चौकशी पुर्ण होत नाही, तोपर्यंत ठेकेदाराचे 30 टक्क्याच्यावर मनपाने बिल अदा करु नये. अन्यथा शिवसेना आयुक्तांच्या कार्यालयात उपोषण करणार असल्याचा इशारा शिवसेनचे उपनेते अनिल राठोड यांनी दिला आहे. जर तुम्ही भ्रष्टाचार लपवला तर आम्ही हा भ्रष्टाचार उघडकीस आणू आणि न्यायालयात न्यायाची मागणी करुन दोषींवर गुन्हा दाखल करु. आठ दिवसात भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा अशी मागणी शिवसेनेचे उपनेते राठोड यांनी केली आहे.
पुढे बोलताना राठोड म्हणाले की, ज्यावेळी शिवसेना पुरव्यासह नगरसेवकांच्या उपस्थितीत आपल्याकडे तक्रार करते. त्याची तुम्ही गंभीर दखल न घेता घनकचरा भ्रष्टाचाराची चौकशी पूर्ण होण्या अगोदर ठेकेदाराचे 60 टक्के बिल अदा करण्याचे निर्णय घेता. हा पैसा जनतेचा आहे. त्याचा उतमात करण्याचा अधिकार तुम्हाला नाही, आयुक्त आपल्याला कार्यालयातील अधिकारी आपली दिशाभूल करत आहे. तुमच्यापर्यंत खोटी माहिती देतात. त्याच्यामुळे तुम्ही आडचणीत येताल. आठ दिवसात आपण या भ्रष्टाचाराची चौकशी पुर्ण करुन दोषींवर कारवाई करा अन्यथा शिवसेना आयुक्तंच्या कार्यालयात उपोषण करणार असा इशारा राठोड यांनी दिला आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, नगरसेवक अमोल येवले, संतोष गेनाप्पा, आनंद लहामगे, गौरव ढोणे, मनीष गुगळे, विशाल वालकर, मंदार मुळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Tags:
Ahmednagar