नगर तालुक्यातील शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या


नगर, (दि.28) :  नगर तालुक्यातील दशमीगव्हाण येथील शेतकरी दादा भाऊ शिंदे ( वय – 55) यांनी स्वतःच्या शेतातील कडूलिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. कोरोनाच्या महाभयंकर संकट मुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी व शेती व्यवसायावरील संकटाने हतबल होऊन त्यातून ही आत्महत्या झाली असावी अशी गावात चर्चा आहे.

मयत शिंदे हे बुधवारी (दि 27) रात्री साडे अकराच्या सुमारास वीज आल्यानंतर शेतास पाणी देण्यासाठी गेले होते. रात्रीच्या वेळीच त्यांनी शेतातील कडूलिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी शेजारील वस्तीवरील लोकांच्या ही बाब निदर्शनास आल्यावर त्यांनी शिंदे कुंटुंबियाना माहिती दिली.

पोलिस पाटील जयसिंग काळे यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यास खबर दिली. नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक धर्मनाथ पालवे यांनी घटना स्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणी साठी जिल्हा रूग्णालयात पाठविला.  

त्याच्या पश्चात पत्नी, २ मुले, सुना असा परिवार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post