नगरचा पारा 43 अंशावर : उष्णतेने नागरिक त्रस्त


नगर, (दि.28) :  उष्णतेच्या लाटेत नगर शहरासह जिल्ह्याची होरपळ होत आहे. तिन दिवसानंतर शहरातील तापमानाचा पारा 43 अंश  सेल्सियस पार गेला आहे. त्यातच विजेचा लपंडाव सुरु झाल्याने नागरिक उष्णतेने त्रस्त होत आहे.

उष्णतेचे उच्चांक गाठला असताना शहरातील अनेक भागामध्ये सध्या विजेचा लपंडाव सुरु आहे. कोरोना संकटावर मात करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार नागरीकांनी घरातुन काम करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र विजेचा लपंडाव सुरु असल्याने अनेकांना अडचणींना तांड द्यावे लागत आहे.

दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही उष्णतेने कळस गाठला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, राजस्थानाहून येणार्‍या उष्ण वार्‍यामुळे उत्तरेकडे वातावरणात उष्मा वाढला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाचा पारा सातत्यान वाढत आहे. मागील वर्षी जिल्हयात चांगला पाऊस झाल्यामुळे मार्च महिन्यात उन्हाळा जाणवला नाही, कारण लोक लॉकडाऊनमुळे घरातच होते. एप्रिल महिन्यातही फारसा उन्हाळा जाणवला नाही, मात्र मे महिन्यात शेवटचा आठवड्यात उष्णतेने उंचाक गाठला आहे.

उन्हाचा पारा वाढत असताना मंगळवारी 41 अंश असलेला पारा गुरुवारी 43 अंशावर पोहचला आहे. शहरातील रस्ते पुर्णपणे सामसुम दिसत होते.

Post a Comment

Previous Post Next Post