‘सिंगर स्टार’ नामांकर ही तर मनपाची अधोगती : गिरीष जाधव

‘सिंगर स्टार’ नामांकर ही तर मनपाची अधोगती :
 शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख गिरीष जाधव

नगर, (दि.22) : नगर महारनगरपालिका यावर्षी स्वच्छ भारत अभियानात मिळालेले ‘सिंगल स्टार’ मानांकर ही प्रगती नसून, एक प्रकारे महानगरपालिकेची अधोगतीच झाली आहे, असे असताना प्रशासन मात्र उत्कृष्ट कामगिरीचे ढोल पिटून नगरकरांची दिशाभूल करीत आहेत अशी टिका शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख गिरीष जाधव यांनी केली आहे.

जाधव यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे की, मागील वर्षी सन 2018 - 19 मध्ये केंद्र सरकारच्या स्वच्छ अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उप्रकमात 'स्टार रेटींग' मानांकनामध्ये नगर महानगरपालिकेने ‘दोन स्टार’ चे मानांकर पटकावले होते. यंदा, सन 2019-20 मध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गतच्या उपक्रमामध्ये महापालिकेने संपुर्ण शहरातील कचरा संकलन व वाहतुकीसाठी ठेकेदाराची नेमणूक केली. परंतु मोठ्या प्रमाणात खर्च करुन सुध्दा महानगरपालिकेस ‘सिंगल स्टार’ चे मानांकर मिळाले आहे. मनपाची अधोगती  झालेली  असतानाही  प्रशासन  मात्र  उत्कृष्ट  कामगिरीचे  ढोल  पिटत  आहे.

Post a Comment

Previous Post Next Post