नगर,(दि.27): राहुरीतील भुमी अभिलेख कार्यालयातील वरिष्ठ लिपिक आशिफ जेनुद्दीन शेख याला जमिनीच्या नकाशाच्या प्रती देण्यासाठी ५०० रुपये लाच घेताना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने मंगळवारी दुपारी रंगेहाथ पकडले. लॉकडाऊनच्या काळात घडलेला हा तालुक्यातील दुसरा प्रकार घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
राहुरी खुर्द, ता.राहुरी येथील तक्रारदार यांना त्यांच्या शेतजमिनीच्या रस्ता कोर्ट केस करिता राहुरी खु. व राहुरी बु.गावांच्या नकाशाच्या प्रती पाहिजे होत्या. सदर प्रती देण्याकरिता आरोपी लोकसेवक सिटी सव्र्हे कार्यालयातील अशिफ जैनुद्दिन शेख (वय ४१ ) प्रती लिपिक,भुमी अभिलेख कार्यालय, राहुरी जि. अहमदनगर. रा. सोनार गल्ली, राहुरी , ता.राहुरी यांनी दि.२६/०५/२०२० रोजी ५०० रुपयांची मागणी केली. सदरची रक्कम दि.२६/०५/२०२० रोजी भूमी अभिलेख कार्यालय,राहुरी येथे कारवाई दरम्यान त्याने पंचा समक्ष स्वीकारली असता त्यास पथकाने रंगेहाथ पकडले. सापळा अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक दिपक करांडे , सहायक अधिकारी श्याम पवरे यांनी काम केले.