महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आत्मसात करा : बाळासाहेब बोराटे

नगर (दि.11) :  महात्मा ज्योतिबा फुले यांनी मानवता धर्माला प्राधान्य दिले असून मानवाच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले आहे. त्या काळातील समाजघातक रुढी - परंपरांना विरोध करुन समाजाला नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले, त्यांनी समाजाच्या उन्नत्तीसाठी केलेल्या विचार आपण आत्मसात केले पाहिजे  असे प्रतिपादन बाळासाहेब बोराटे यांनी केले.  महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त बोराटे यांनी घरीच अभिवान केले.

पुढे ते म्हणाले की, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ महात्मा फुले यांनी रोवली म्हणूनच आजची स्त्री ताठ मानेने उभी आहे. त्यांनी समाजाच्या उन्नत्तीसाठी केलेल्या विचार आपण आत्मसात केले पाहिजे. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी प्रशासन झटत आहे. आपणही त्यांना साथ दिली पाहिजे. शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये. प्रभागातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन  नगरसेवक  बाळासाहेब  बोराटे  यांनी  केले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते परेश लोखंडे उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा न करतांना घरीच अभिवादन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post