लॉकडावून काळात न्यू आर्ट्स महाविद्यालयात ऑनलाइन वर्गांचे आयोजन : प्राचार्य डॉ.भास्कर झावरे


नगर (दि.15) : लॉक डाऊन काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालच्या वतीने ऑनलाइन वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या बी.सि.ए. विभागामार्फत लॉक डाऊन  कालखंडामध्ये प्रथम वर्ष ते तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन लेक्चर्स सुरू आहेत. तसेच पदव्युत्तर वर्गासाठी विहित अभ्यासक्रमाबरोबरच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत आहे. सध्या लॉक डाऊन मुळे सगळीकडे  महाविद्यालये बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख प्रा.अरुण गांगर्डे यांनी विभागातील शिक्षकांच्या मदतीने ऑनलाइन अध्ययनाचे काम सुरू केले आहे. 

विद्यार्थ्यांचा या उपक्रमाला अतीशय उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक एकमेकांशी जोडले जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना वर्गातच असल्यासारखे वाटत आहे. सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या  नोट्स डिजिटल माध्यमातून देत आहेत. बि.सि.ए .विभाग प्रमुख आणि विभागातील सर्व शिक्षकांनी डिजिटल क्लासरूम च्या माध्यमातून या शैक्षणिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागी करून घेऊन आपल्या संबंधित विषयांचे स्टडी मटेरियल व विविध प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमात सोबतच इतर माहितीही ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहेत. बीसीए विभागामार्फत सुरू असलेल्या डिजिटल क्लासरूम च्या माध्यमातून विभागातील सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर झावरे यांनी नुकतेच ऑनलाइन  मार्गदर्शन केले. 

करोना साथ आणि त्यामुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी खचून न जाता विद्यार्थ्यांनी योग्य काळजी घेऊन  आणि  शासनामार्फत दिलेल्या सूचनांचे पालन करून त्याचा सामना करावा असे आव्हान केले. डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून सुरू असलेल्या अध्ययन कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना मिळत असलेली शैक्षणिक माहिती, विविध विषयांचे अभ्यासक्रमाशी संबंधित स्टडी मटेरियल याबद्दल प्राचार्य  डॉ. झावरे यांनी समाधान व्यक्त केले आणि या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले. 

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विभागातील प्राध्यापक सौ प्रिया पाटील मॅडम , प्रवीण कुलकर्णी , प्रा. दिपाली जगदाळे आणि सर्व सहकारी प्राध्यापक यांनी विशेष परिश्रम घेतले. लॉक डाऊन कालावधी संपेपर्यंत हा उपक्रम विभागामार्फत सलगपणे राबविण्यात येणार आहे अशी माहिती  विभागप्रमुख प्रा.अरुण गांगर्डे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post