मुकुंदनगरमधील सर्व कुटुंबांच्या स्वस्त धान्याचा खर्च खा. सुजय विखे पाटील देणार


नगर (दि.15) : जिल्हा प्रशासनाने शहरातील ‘हॉटस्पॉट’ असलेल्या मुकुंदनगर हा भाग ‘सील’ केलेला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन मुकुंदनगरमध्ये राहत असलेल्या अडीच हजार घरांना घरपोहोच स्वस्त धान्य वितरण व्हावे या स्वस्त धान्याचा खर्च मी देईल, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

शहरातील कोरोना विषाणू फैलाव होऊ नये यासाठी महापालिका प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी महापालिकेत बैठकीचे आज दुपारी आयोजन केले होते. या बैठकीत महापौर बाबासाहेब वाकळे, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त सुनील पवार, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे आदींसह महापालिकेतील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते

या बैठकीत खा. विखे पाटील यांनी मुकुंदनगर परिसराची सद्यस्थितीचा आढावा घेतला. खा. विखे म्हणाले मुकुंदनगरमध्ये नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, भाजीपाला किराणा यासंदर्भातील अनेक अडचणी त्यांना येत आहेत त्या दूर होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. मुकुंदनगरमध्ये नागरिकांना घरपोच स्वस्त धान्य सेवा कशी उपलब्ध होईल, याबाबतही त्यांनी चर्चा केली.

कर्मचाऱ्यांना सॅनिटायझरचे वाटप 

महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सोळाशे सॅनिटायझरच्या बाटल्या खा. सुजय विखे यांच्याकडून आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या.

Post a Comment

Previous Post Next Post