कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती उत्सवाचे सावेडी मधील सर्व कार्यक्रम रद्द
नगर (दि.10) : सावेडी उपनगरातील महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू असलेले लॉक डाऊन लक्षात घेता जयंती उत्सवाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. कार्यकर्त्यांसह नागरिकांना या दोन्ही महापुरुषांची जयंती घरीच साजरी करण्याचे आवाहन उत्सव समितीचे पदाधिकारी एन.एम. पवळे व डॉ.भास्कर रणन्नवरे यांनी केले आहे.
दरवर्षी सावेडी उपनगरात महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने सांस्कृतिक, सामाजिक व व्याख्यानासह विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी देशापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले असताना जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय उत्सव समितीच्या सदस्यांनी घेतला आहे. नुकतीच दूरध्वनीवर सर्व पदाधिकार्यांची चर्चा झाली. याद्वारे एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व कार्यकर्ते व नागरिकांना समितीच्या वतीने चांगल्या आरोग्यासाठी घरीच थांबण्याचे सांगण्यात आले आहे.
Tags:
Ahmednagar