महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा

| अहिल्यानगर | ०१ ऑगस्ट २०२५ | आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत जिल्ह्यास विशेष घटक योजना व बीजभांडवल योजना या दोन्हीं अंतर्गत प्रत्येकी ८० प्रकरणांचे, तसेच थेट कर्ज योजना अंतर्गत २० प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. अनुसूचित जातीतील इच्छुक अर्जदारांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एल. काची यांनी केले आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महार, नवबौद्ध, बुरूड, मेहतर, वाल्मीकी इत्यादी समाजातील असावा. अर्जदार किंवा त्यांचे पती/पत्नी यांनी यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट आकारातील फोटो, व्यवसायासाठी लागणारे कोटेशन, वीज बिल, मालमत्तेची टॅक्स पावती, भाडेकरारनामा किंवा उतारा, व्यवसायाचा ना हरकत दाखला व शाळेचा दाखला ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.

योजनेविषयी अधिक माहिती Maha Disha संकेतस्थळावर (https://mpbcdc. maharashtra .gov.in) उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्यादित), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सावेडी, नगर-मनमाड रोड, अहिल्यानगर येथील कार्यालयाशी संपर्क साधावा.


Post a Comment

Previous Post Next Post