बौद्ध संस्कार परिवाराच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती डिजिटल पद्धतीने साजरी


नगर, (दि.16) : बौद्ध संस्कार परिवाराच्यावतीने 14 एप्रिल भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर जयंती सकाळी 9.30 वा. 40 परिवारांकडून आपआपल्या घरीच मोबाईलद्वारे एकाचवेळी सामुदायिक वंदना घेऊन डिजिटल पद्धतीने साजरी करण्यात आली.

कोरोना व्हायरसच्या वाढता प्रादुर्भाव, शासनाच्या नियमांचे पालन म्हणून भीम अनुयायांनी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती’ आपआपल्याच निवासस्थानी साजरी करण्याचे ठरविले. बौद्ध संस्कार संघाचे बौद्धाचार्य भाऊसाहेब देठे आणि देठे परिवाराने पुढाकार घेऊन या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. यात 40 परिवारांनी भाग घेऊन सामुदायीक पद्धतीने मोबाईलद्वारे डिजिटल बुद्ध वंदना करण्यात आली.

बौद्धाचार्य भाऊसाहेब देठˆयांनी जयंती निमित्त सामाजिक संदेश म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडतांना म्हणाले, सर्व व्यवहार हे समाजातच होतात, समाजाशिवाय मनुष्य राहू शकत नाही, तेव्हा समाजहित महत्वाचे समजूनकार्य करावे. आपले विचार हेच कार्य करतात, यामुळेच समाज आदर्श बनतो. आदर्श म्हणजे शिलाचे पालन या विचारानेच मनुष्य ज्ञानी होतो. याच्या अभावानेच मनुष्य अज्ञानी राहतो. अज्ञान नष्ट होणे म्हणजेच सम्यक दृष्टी येणे होय. हेतू हा कि, आपल्याकडून वाचा, शरिर व मनाने योग्य कृती करणे होय. तसेच आपल्या कमाईतील उत्पन्नाचा 20 वा हिस्सा इतरांना मदत करावी, असा उपदेश करुन सर्वांनी शासनाला सहकार्य करुन आपण सर्वजण मिळून भारत देशाला व जगाला कोरोनापासून मुक्त करु, अशी प्रार्थना केली.

या उपक्रमात अरविंद जाधव, किशोर वाघमारे, अरविंद शिंदे, डॉ.शशिकांत पाचारणे, मनेश कांबळे, सुनिल बोरुडे, डॉ.प्रदीप चौदंते, महेंद्र पवार, सुनिल ठोवाळ, एम.बी.साळवे, संजय जाधव, डि.सी.तरकसे, अभिजित शिंदे, सविता चांदणे  आदिंसह सुमारे 40 परिवारांनी सहभागी होऊन डिजिटल सामुहिक बुद्ध वंदना केली.

Post a Comment

Previous Post Next Post