कोरोना विरोधातील लढाई आपण घरी बसून जिंकू शकतो : सुवर्णा जाधव

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने 

महात्मा ज्योतीबा फुले यांना अभिवादन
 
नगर (दि.12) : माणूस संकटात असेल तर कोणाताच देश प्रगती करू शकत नाही. आणि जो देश लोक भावनांचा विचार करुन त्यांच्या उन्नत्तीसाठी कार्य करतो, तोच देश प्रगती करु शकतो म्हणून महात्मा फुले यांनी माणसाला किंमत देऊन माणुसकी धर्म टिकवला व भारत देशाची पाया भरणी शिक्षण, आरोग्य, समता, विज्ञान यावर आधारित केली. आज देशात कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी शासन व प्रशानस ज्या पद्धतीने कार्य करत आहे. आपल्या रक्षणासाठी ही यंत्रणा रात्रं-दिवस कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत आपणही त्यांना साथ देणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन कोरोना विरोधातील लढाई आपण घरी बसून जिंकू शकतो. त्यांचबरोबर गरजवंतांना मदत करुन महात्मा ज्योतीबा फुले यांचे कार्य आपण पुढे नेऊ शकतो, असे प्रतिपादन नगरसेविका सुवर्णाताई जाधव यांनी केले.

महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त घरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास  सोशल डिस्टींगचे पालन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका सुवर्णा जाधव, नंदनवन उद्योग समुहाचे संजय जाधव, समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, डॉ.अमोल जाधव, कपिल जाधव, राज जाधव, आशा जाधव, मंगल जाधव, अंजली जाधव, डॉ.प्राजक्ता जाधव आदि परिवारातील सदस्य उपस्थित होते.

दत्ता जाधव म्हणाले, महात्मा फुले यांनी दाखविलेल्या मार्गावर आपण काम करण्याची वेळ आली आहे. समाजहित समोर ठेवून कोरोनाचा मुकाबला आपणास करावाचा आहे. त्यामुळे समता परिषदेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती घरीच साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे सर्वांनी घरीच जयंती साजरी केली आहे. त्याचप्रमाणे समता परिषदेच्या माध्यमातून गरजूंना प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन मदत करण्यात येत आहे. या लॉकडाऊनच्या  काळात महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन केलेल साहित्याचे वाचन करावे, असे साहित्य व्हॅटस्अप ग्रुपवरही  उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे सांगून सर्वांनी घरीच राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही दत्ता जाधव यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post