श्रीकानिफनाथ देवस्थानकडून मास्क व सॅनिटायझरचे वाटप

 
नगर, (दि.14) : कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी श्रीक्षेत्र मढी येथील श्रीकानिफनाथ देवस्थान ट्रस्टने परिसरातील गोर - गरीब कुटूंबियांना देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे व  विश्वस्त आप्पासाहेब राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मास्क व सॅनिटायझरचे वितरण केले. यावेळी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोकराव पवार, माजी अध्यक्ष सचिन मरकड, डाॅ.रमाकांत मरकड, माजी सरपंच भगवान मरकड, उपसरपंच रविंद्र आरोळे, ज्येष्ठ नागरिक विष्णु मरकड, बाबासाहेब कुटे, मनोहर साळवे हे ग्रामस्थही उपस्थित होते.
श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या कार्यरत विश्वस्त मंडळामधील अध्यक्ष शिवशंकर राजळे, उपाध्यक्ष सुनिलराव सानप, विश्वस्त आप्पासाहेब मरकड व मिलिंद चवंडके यांनी देवस्थानच्यावतीने परिसरातील गोर-गरीब कुटूंबियांना मास्क व सॅनिटायझरचे मोफत वितरण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यासाठी दर्जेदार कापडी मास्क व सॅनिटायझरची खरेदी केली.
संपूर्ण देश कोरोनाच्या विरोधात लढत असताना राष्ट्रीय कार्यामधील सहभाग म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला देवस्थानतर्फे २१ लाखांची मदत नुकतीच करण्यात आली. त्यापाठोपाठ परिसरातील गोर-गरीब कुटूंबियांना कापडी मास्क व सॅनिटायझरचे वितरण करून सामाजिक बांधिलकीही जपली.

देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, उपाध्यक्ष सुनिलराव सानप, विश्वस्त आप्पासाहेब मरकड व मिलिंद चवंडके यांनी दिलेल्या सुचनांनुसार देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोकराव पवार, व्यवस्थापक बाबासाहेब मरकड, कर्मचारी संजय मरकड, संतोष मरकड, अविनाश मरकड, सुरेश मरकड, विजय रासकर, अशोक मरकड, राधाकृष्ण मरकड, बबन मरकड, पाराजी मरकड, अर्जुन मरकड आणि शिवाजी मरकड हे या सामाजिक कार्यासाठी अथक परिश्रम घेऊ लागले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post