मावा बनवणार्‍या दोघांना एलसीबीने घेतले ताब्यात


मावा बनविण्याच्या मशीनसह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त 

नगर (दि.22) : शेवगांव तालुक्यातील बोधेगाव येथे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने छापा टाकून दिड लाख रुपयांची सुगंधी तंबाखू व मावा बनविण्याचे साहित्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे. मावा बनवनार्‍यांवर छापा टाकून ताब्यात घेतल्याने अनेकांचे धाबे दणानले आहे.

आरोपीमध्ये शेख जमीचर रशिद व रविंद्र पंढरीनाथ शिंदे या दोघांचा समावेश आहे.

माहिती अशी की, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांच्या पथकाने शेवगांव येथील बोधेगाव परिसरात जावून शेख जमीर रशिद (रा.बोधेगाव), रविंद्र पंढरीनाथ शिंदे (रा.घोरतळे गल्ली बोधेगाव) हे राहत्या घरात चोरून महाराष्ट्र राज्यात सुगंधी तंबाखू विक्री बंदी असतानाही घरात मशिनवर तंबाखू मिक्स करत मावा तयार करुन विक्री करीत असल्याचे समजले. त्यानुसार नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सकाळी अचानक छापा टाकून या छाप्यात शेख जमीर रशिद (रा बोधेगाव), रविंद्र पंढरीनाथ शिंदे (घोरतळे गल्ली बोधेगाव)  यांना ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे,रवींद्र कर्डीले, संतोष लोंढे, राहुल सोळंके, रवींद्र घुंगसे,प्रकाश वाघ, सागर ससाणे, रोहिदास नवघिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post