कोणी उसणवारी पैसे देता का 'कोणी' : सरकारचे शिक्षकांकडे दुर्लक्ष

 कोणी उसणवारी पैसे देता का 'कोणी'

विना अनुदानित प्राध्याकांचे व्हॉटसअ‍ॅपवर आवाहन

सरकारचे शिक्षकांकडे दुर्लक्ष


सुभाष चिंधे (दि.22) : गेल्या 18 वर्षापासून विना अनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यलयात काम करणार्‍या प्राध्यापकांचे जीवन धोक्यात आले आहे. तब्बल 200 देशामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असताना संपूर्ण देशासह राज्यात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत विना अनुदानित कॉलेजमध्ये काम करणार्‍या एका प्राध्यापकाने कोणी कोणी उसणवारी पैसे देता का ? कोणी अशी हाक सोशल मिडीयावर व्हायरल केली आहे. गेल्या महिन्याभरापासून विना अनुदानित कॉलेजवर तासिकावर काम करणारे प्राध्यापकांचा परिवार मोठ्या संकटात आहे. याकडे मात्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह ठाकरे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

विना अनुदानित ज्युनिअर कॉलेजमधील प्राध्यापकांना 20 टक्के अनुदान देऊन पगार सुरू करावे यासाठी विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय कृति समितीने शेकडो आंदोलने केली. युतीचे सरकार आणि आता त्रिशंकू असे शिवसेना, कॉग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार असून प्राध्यापकांवर अन्याय करत असल्याचे दिसून येते. प्राध्यापक तासिकाबेसवर काम करत असून जेवढे तास होतील तेवढेच पैसे मिळतात. तर काही ठिकाणी प्राध्यापकांना ठराविक पैसे दिले जातात. त्या पैशात प्राध्यापक आपल्या परिवाराचा उदारनिर्वाह करत असतात. प्राध्यापक विनावेतन ज्ञानदानाचे पवित्र काम करून आपला उदारनिर्वाह चालविण्यासाठी सुट्टीच्या दिवशी व कॉलेज सुटल्यानंतर काम करतात. मात्र गेल्या एक महिन्यापासून प्राध्यापकांना कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहे. शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली असून मित्र, नातेवाईक, शेजारी व परिचयाचे असतील त्यांना पैशांची मागणी करत आहे अशी जीव घेणी परिस्थिती विना अनुदानित प्राध्यापकांवर ओढावली आहे.

 विना अनुदानित प्राध्यापकाने गेल्या महिन्याभरापासून कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने कॉलेज बंद असल्याने पगार झाले नाही. पैशाची चणचण भासल्याने तसेच परिवाराचा उदारनिर्वाह करण्यासाठी  व्हॉटस्अ‍ॅपवर एका कोणी कोणी उसणवारी पैसे देता का कोणी अशी हाक दिली आहे. या प्राध्याकांने व्हॉटसअ‍ॅपवर आवाहन करत जर कोणला उसने स्वरुपात आर्थिक मदत करायची असले तर खालील नंबर किमान 100 रुपयांची मदत करू शकता. पैसे टाकल्यावर स्क्रीनशॉट मोबासईलवर टाका तसेच ही मदत मला अनुदान आल्यानंतर परत केली जाणार आहे. हा मेजेस दुसर्‍या ग्रुपवर पाठू नका असे एका विना अनुदानित प्राध्यापकांने व्हॉटस्गु्रपवर मेसेज टाकले आहे. कर्जत तालुक्यातील एका प्राध्यापकाने कोरोनामुळे सर्व बंद झाले आणि पैसे नाही अशा परिस्थितीत थेट परिवाराचे उदरनिर्वाह करण्यासाठी भाजीपालाचा स्टॉल टाकला. विना अनुदानित अशा शेकडो  प्राध्यापक मोठ्या आर्थिक अचचणीत सापडले आहे. ज्ञानदानाचे काम करणार्‍या शिक्षकांना किराणा कोणी देत नाही कारण तो गरिबांमध्ये मोडत नाही तर दिला तर त्याला अपमान वाटेल म्हणून कोणी देत नाही अशा द्विधा मनस्थिती सध्या प्राध्याक अडकले आहेत. संगमनेर, कर्जत, नगर तालुक्यासह नगर शहरात विना अनुदानित कॉलेजवर काम करणार्‍या प्राध्यापकांना कोणी वाली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
वर्षाताई जरा लक्ष द्या
गेल्या अनेक वर्षापासून विना अनुदानित ज्युनिअर कॉलेजवर काम करणार्‍या प्राध्यापकांना पगार सुरू करावे यासाठी मुंबईत आझाद मैदानावर लाठ्या खाल्या. त्यानंतर सरकारला प्राध्यापकांचे किव आली नाही. आता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन असताना प्राध्यापकांच्या घरात मुलांना खायला नाही. शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड जरा विना अनुदानित प्राध्यपकांकडे लक्ष द्या, नाही मोठे संकट प्राध्यापकांवर येणार असल्याची प्रतिक्रिया प्रा. उमादेवी शेळके, सचिन पालवे, घायतडक, अबू इनामदार, झणझणे, शेखर अंधारे, गणेश पुंड, सुभाष चिंधे यांनी केले आहे.

आता मरायची वेळ आली
कोरोनामुळे कॉलेज बंद असल्याने काम नाही तर पैसे नाही, घर कस साभांळायाचे अशी जीवघेणी परिस्थिती विना अनुदानित कॉलेजवर काम करणार्‍या प्राध्यापकांवर आली आहे. सरकार आणि शासन लक्ष देत नाही पैसे नसल्याने उदारनिर्वाह कसे करायचे असा प्रश्‍न समोर असल्याचे आता मरायची वेळ आली अशी खंत ज्ञानेश्‍वर बडेर्र्, गिरमकर यांच्यासह आदिनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post