केशकर्तनालयाचे दुकान बंदमुळे त्यांनी केली मुलाची कटिंग

 

नगर (दि.09) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. केशकर्तनालयाचे दुकानेही त्याला अपवाद नाहीत. यामध्ये दाढी घरीच करण्यावर अनेकांनी भर दिलेला आहे. मात्र कटिंगचे करायचे काय असा प्रश्‍न सर्वांना समोर उभा राहिलेला आहे. तशीच परिस्थिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी वासुदेव सोळंके यांच्या मुलाच्या बाबतीत झाली, मुलाची वाढलेली कटिंग कोठे करायची असा प्रश्‍न उभा राहिला होता. परंतु त्यांनी त्यावर मात करत घरीच मुलाची कटिंग केली.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी आपल्या राजवर्धन मुलाची वाढलेली कटिंग लॉक डाऊनमुळे घरीच कटिंग करून सर्वांना आपली कामे घरीच करावी हाच संदेश त्यांनी कृतीतून दाखवून दिला आहे. त्यांच्या या कामास पत्नी मैथली सोळंके यांनी मदत केली.

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आता नविनचं संकट सर्वत्र पाहिला मिळत आहे. सगळे हेअर कटिंग सलून बंद असल्याने केस कसे कापारचे हा प्रश्‍नच निर्माण झाला आहे. मग कार तर.. आम्ही आपला घरगुती पर्याय शोधला असल्याचे प्रतिक्रिया समोर येवू लागल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post