नगर (दि.09) : शहरातील कायनेटिक चौक परिसरामध्ये गुरवारी एका भंगार दुकानाला अचानक आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कायनेटीक चौकात लागलेल्या आगीमध्ये पाच ते सात दुकाने जळून खाक झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आग विझवण्यासाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने प्रयत्न सुरु केले आहे.
त्याचबरोबर नगर शहर, एमआयडीसी, व्हिआरडी आदी ठिकाणवरुन अग्निशमन वाहनांना पाचारन करण्यात आले असून आग अटोक्यात आण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नाही. यासंदर्भात विभागाचे प्रमुख यांच्याशी संपर्क साधला असता आग विझविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Tags:
Ahmednagar