पोलिस व्हॅनमध्ये सॅनिटायझर फवारणी यंत्रणा सज्ज


 पोलिस व्हॅनमध्ये सॅनिटायझर फवारणी यंत्रणा सज्ज

पोलिसांच्या सुरक्षेसाठी आता ‘पोलिस व्हॅन’

नगर (दि.09) : अहमदनगर जिल्हा पोलिस दलातील पोलिस कर्मचार्‍यांचे संरक्षणासाठी पोलिस अधीक्षक यांचे संकल्पना व मार्गदर्शन खाली सँनिटायझर वाहन बणविणेत आले आहे. सॅनिटाईझ करण्यासाठी पोलीस गाडीत सॅनिटाईझ फवारा तयार करण्यात आला आहे. गाडीत चढताच अंगावर त्या फवार्‍याचे थेंब पडतात आणि कर्तव्यावर चढणारा पोलीस कर्मचारी सॅनिटाईझ होतो.

सदर सँनिटायझर वाहन हे चेक पोष्ट, नाका बंदी, पोलिस स्टेशन इत्यादी ठिकाणी जाऊन बंदोबस्ताचे कर्मचारी यांना सँनिटायझर करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जेणेकरून पोलीस हे सुरक्षित राहून बंदोबस्त करतील. संगमनेर, शिडीँ, शेवगाव, कर्जत, श्रीरामपूर - 2, अहमदनगर ग्रामीण, अहमदनगर शहर- 2 असे एकुण 9 वाहने तयार करून नमूद ठिकाणी पाठविण्यात आली आहेत.

सदर वाहनामध्ये औषध फवारणी करणेचा 18 लिटरचा बँटरीवरचा पंप बसविण्यात आला असुन त्याला पाईपचे कनेक्शन देऊन 5 नोझल बसविले आहेत. सदर पंपा मध्ये अधिकृत औषध मिसळून ते कर्मचारी यांचे संपूर्ण अंगावर फवारले जाते. एका टँक मध्ये 50/60 कर्मचारी होतात.

24 तास कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांवर सध्या लॉकडाऊनच्या यशाची भिस्त आहे. कर्तव्यावर असताना पोलिसांचे देखील संरक्षण तितकेच महत्वाचे आहेत. या संरक्षणासाठी पोलिसांची मोठी गाडी आता सॅनिटाईझ गाडी म्हणून समोर आली आहे. गाडीमध्ये पाईपच्या माध्यमातून सॅनिटाईझ करणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे. गाडीत प्रवेश करताच निर्जंतुकीकरण करणारे शॉवर अंगावर पडतात. पोलिसांच्या वाहनात अनोख्या पद्धतीने सॅनिटाईज करण्याचा हा उपक्रम पोलिसांसाठी संरक्षण कवचच ठरणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post