...राजकीय दबावातून खोटे गुन्हे दाखल करण्याचे सत्र : खा.निलेश लंके

अहिल्यानगर शहरात पोलिस यंत्रणेचे राजकीय दबावातून खोटे गुन्हे दाखल करण्याचे सत्र  : खा.निलेश लंके यांचा गंभीर आरोप 

| अहिल्यानगर | 03 ऑगस्ट 2025 |  सध्या नगर शहरातील पोलिस प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, काही पोलीस अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप खासदार निलेश लंके यांनी केला. यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गडद सावट पसरले असून, नागरिकांमध्ये पोलिस यंत्रणेवरील विश्वास डळमळीत झाल्याचे दिसून येत असल्याचे लंके यांनी पोलिस प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, माजी नगरसेवक योगीराज गाडे, प्रदिप परदेशी, युवा सेनेचे प्रशांत भाले, शिक्षक सेनेचे अंबादास शिंदे, दिपक भोसले, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नलिनी गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शिवसेनेचे शहरप्रमुख किरण काळे यांच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी एका खोट्या बलात्कार गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. आता या मालिकेत आणखी एक प्रकरण जोडले गेले असून, माजी मंत्री व शिवसेना उपनेते दिवंगत अनिलभैय्या राठोड यांचे सुपुत्र विक्रम राठोड यांच्यावरही कोणतीही प्राथमिक चौकशी न करता थेट अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण अत्यंत संशयास्पद ठरले असून, फिर्यादी व्यक्तीचा संबंध सत्ताधारी पक्षाच्या राजकीय पाठबळ असलेल्या गटाशी असल्याचे खा. लंके यांचे म्हणने आहे.

या संपूर्ण प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, सुभाष चौक येथे जाणीवपूर्वक गोंधळ घालणाऱ्या फिर्यादी व्यक्तीच्या विरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. पोलिस त्या वेळी घटनास्थळी उपस्थित होते.

👉 क्लिक करुन वाचा...  

Post a Comment

Previous Post Next Post