सहा जुगार्यासह ; 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
नगर (दि.23) : लॉकडाऊनच्या काळात केडगाव येथे सुरू असलेल्या जुगार क्लबवर एलसीबी पोलिसांनी बुधवारी (दि.22) रोजी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी 10 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 6 जुगार्यांना ताब्यात घेतले आहे. या सहा जणांविरुध्द कोतवाली पोलिसा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश दिगंबर डिसले, अनिल सुभाष कोतकर, अभिजित अजुन कोतकर, महेश अशोक कोतकर, श्रीकांत ज्ञानदेव येवले, संतोष रावसाहेब हुगले (सर्व रा.केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या जुगार्यांची नावे आहे.
केडगाव येथील कोतकर मळ्यात कंपाऊंडच्या आडोशाला काही इसम तिरट जुगार खेळत असल्याची माहिती एलसीबी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी सायंकाळी कोतकर मळ्यात त्यांनी छापा टाकला. या छाप्यामध्ये सहा जण तिरट जुगार खेळताना आढळून आले.
त्याच्याकडून जुगाराचे साहित्य, रोकड असा सुमारे 10 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुगार्याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दत्तात्रय गव्हाणे, बाळासाहेब मुळीक, विशाल बेरड, ज्ञानेेशर शिंदे, रवींद्र कर्डिले, विशाल गवांदे आदींनी ही कारवाई केली.