नगर (दि.23) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 25 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना शहरातील नगर - औरंगाबाद महामार्गावरील एम्स हॉस्पिटल कोविड 19 करोना आजारासंबंधित रुग्णांवर उपचारासाठी ताब्यात घ्यावे ही निवेदनाद्वारे विनंती केली होती व हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरसह जवळपास 100 बेड व सर्व सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार या हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारे करता येतील व हे हॉस्पिटल शहरात महामार्गावर असल्यामुळे रुग्णांना व उपचार करणार्या डॉक्टरांना सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे सोयीस्कर होईल याकडे मनसेने निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते.
त्या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकार्यांनी एका बँकेच्या ताब्यात असलेले हे हॉस्पिटल करोना रुग्णांवर उपचाराकरिता हॉस्पिटल ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या मागणीची जिल्हाधिकार्यांनी दखल घेतल्यामुळे मनसेचे नितीन भुतारे व कार्यकर्त्यानी त्यांचे आभार मानले असल्याची माहिती भुताने यांनी दिली.
Tags:
Ahmednagar
