शेंडी बायपास येथील घटनेत पोलीस गंभीर जखमी
नगर (दि.23) : नगर-औरंगाबाद रोडवरील शेंडी येथील बाह्यचळण चौकात नगरकडे जाणार्या भरधाव वेगात टँकरने वाहतुक पोलीसाला उडविल्याची घटना घडली. या अपघातात वाहतुक पोलीस कर्मचारी नदीम शेख हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी दि.23 एप्रिल रोजी पहाटे तिनच्या सुमारास हा अपघात झाला.
नगर तालुक्यातील शेंडी बायपास येथे नगर शहराकडे जाणारी जड वाहतुक बायपासमार्गी वळविण्यासाठी तसेच काही सोडविण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आले होते. याठिकाणी पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचार्यांची कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नियुक्ती करण्यात आली होती. गुरुवारी पहाटे तिनच्या सुमारास एमएच 12 आरएन 6998 या क्रमांकाचा टँकर भरधाव वेगाने नगरकडे जात असताना बॅरिेकेडिंगला उडवून दिले. त्यामध्ये शेख यांना वाहनाची जोराची धडक लागली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. तर काही अंतरावर जाऊन टँकर पलटी झाला.
त्याठिकाणी असलेले अन्य पोलीसांनी शेख यांना नगरमध्ये रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आडवा झालेल्या टँकरला सरळ करण्यासाठी तब्बल चार ते मोठे स्के्रन आणले होते. त्यांनी देखिल मोठी कसरत करत टँकर उभा करण्यासाठी प्रयत्न केले.