उद्धवजी, अयोध्या वारीनंतर शेतकरी वारीही करा; बच्चू कडू
मुंबई (दि.05) : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या राजवटीचे १०० दिवस झाल्याच्या निमित्त राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ७ मार्च रोजी अयोध्येचा दौरा करणार आहेत. यावर ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अयोध्यावारी झाली की त्यांनी एकदा शेतकरी वारी करावी, असा टोमणा मंत्री बच्चू कडू यांनी मारला आहे.
या संदर्भात उल्लेखनीय आहे की मविआ सरकारने घोषित केलेल्या शेतकरी कर्जमाफीची बच्चू कडू यांनी ‘काजमाफीचे बुजगावणे’ म्हणून संभावना केली होती. अयोध्या वारीनंतर उद्धव ठाकरे यांनी शेतकरी वारी करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे कडू यांनी सुचवले आहे.
आज राज्यातील शिवसैनिक राम जन्मभूमीकडे रवाना झाले आहेत. राज्यभरातील शिवसैनिकांना घेऊन १८ डब्ब्यांची एक विशेष रेल्वेगाडी आज दुपारी मुंबईतील लोकमान्य टर्मिनसवरून आयोध्येकडे रवाना झाली असून ती उद्या सायंकाळी अयोध्येला पोहचेल. उद्धव ठाकरे यांचा शनिवारचा एकदिवसाचा अयोध्या दौरा आटोपल्यानंतर शिवसैनिक लगेच परतणार आहेत.

Tags:
Maharashtra