ओम शिवानंद महाराज यांची केडगावात रथयात्रा
नगर (दि.05) : विश्वात्मक ओम शिवानंद परिवार प्रतिष्ठान केडगाव द्वारा आयोजित भव्य रथयात्रा भव्य दिव्य आणि उत्साही वातावरणात नुकतीच पार पडली. यावेळी महाराष्ट्रातून विविध ठिकाणावरून भाविक वर्ग केडगाव येथे दाखल झाला होता.
या रथयात्रेत भव्य दिव्य रथ, उंट, घोडे खास आकर्षण होते. विश्वात्मक ओम शिवानंद महाराज यांची रथयात्रा शाहूनगर, अंबिकानगरमार्गे सोनेवाडी चौकातून लोंढे मळ्यापर्यंत गेली. सर्व रस्त्यावर भाविकांनी पाण्याचे सडे व रांगोळी काढून स्वागत केले. यावेळी सनई चौघड्याच्या सुरात रथयात्रा पुढे प्रस्थान करत होती. विद्यात रोषणाई पाहण्यासाठी केडगाववासियांनी गर्दी केली.
Tags:
Ahmednagar
