नगर : शहर परिसरात घरफोडी, चोरी करणार्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि.9) रोजी करण्यात आली आहे.
आरोपींमध्ये समीर खाँजा शेख (वय 22, रा.सबजलचौक,नगर), परवेज महेमुद्द सय्यद (वय 19, रा.भांबडगल्ली, भोसले आखाडा, अ.नगर), गणेश उर्फ गौतम संजय भंडारी (वय 20, रा.शिवाजीनगर, कल्याणरोड,.नगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहे.
घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी सय्यद शेख यास ताब्यात घेतले व त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन वरील व्यक्ती ताब्यात घेतल्या. आरोपीकडून चोरलेल्या मुद्देमालापैकी 5 हजार 500 रुपये किंमतीचे दोन मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली 50 हजार रुपये किंमतीची बिगर नंबरची सुझुकी एक्सेस मोटारसायकल असा एकूण 55 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील सहायक फौजदार सोन्याबापू नाणेकर, पोलीस हवालदार मनोहर गोसावी, विजय वेठेकर, पो.ना.रविंद्र कर्डिले, सचिन अडबल, ज्ञानेश्वर शिंदे, प्रकाश वाघ, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, सागर सुलाणे यांनी केली आहे.
Tags:
Ahmednagar
