प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करा : जगताप


नगर  : नगरमध्ये ’करोना’बाधीत रुग्ण सापडल्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून संबंधित यंत्रणांना योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात यावेत,’ अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे. जगताप यांनी तसे पत्रच जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

’करोना’ या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून ’त्या’ रुग्णाशी संबंधित लोकांची तपासणी व खबरदारी घेणे आवश्यक आहे; तसेच नगर शहरातील शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहांनाही खबरदारी म्हणून योग्य त्या सूचना देणे आवश्यक आहे. याशिवाय आवश्यकता वाटल्यास शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या देणे गरजेचे आहे. तरी याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा; तसेच या आजारावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी,’ अशी मागणीही जगताप यांनी केली आहे.

दरम्यान, नगरमध्येच ’करोना’ विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आढळल्यानंतर भीतीचे वातावरण पसरले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्कच्या मागणीत वाढ झाली आहे. याशिवाय हँड सॅनिटायझरची मागणीही वाढली आहे. मास्क व हँड सॅनिटायझर घेण्यासाठी मेडिकल विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी दिसू लागली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post