जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके व परिक्षीत यादव यांना पदोन्नती

। अहमदनगर । दि.16 सप्टेंबर । जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके व परिक्षीत यादव यांना पदोन्नती होऊन बदली झाली आहे त्याबद्दल जिल्हा परिषदेच्या वतीने या दोन्ही अधिकार्‍यांना सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांची पदोन्नती होऊन त्यांची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बीड जिल्हा परिषदेत बदली झाली आहे.तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांना पदोन्नती मिळाली आहे. त्यांची बदली रत्नागिरी येथे झाली आहे.

पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा जिल्हा परिषदेत सत्कार करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर ,प्रकल्प संचालक सुनिल पटारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिल कुमार ओसवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदीप सांगळे, अरुण हरीषचंद्रे, मनोज ससे शिवाजी शिंदे शिवाजी भिटे यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post