स्त्री हे शक्तीचे प्रतिक असून, त्यांचा समाजात सन्मान झालाच पाहिजे : संजय सपकाळ


हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महिलांचा सन्मान करुन स्वच्छता अभियान

नगर  (दि.08 ) : भिंगार येथील हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महिला दिना निमित्त स्त्री शक्तीचा सन्मान करुन, निरोगी आरोग्याचा संदेश देत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भिंगार कॅन्टोमेंटच्या भगवान गौतमबुध्द जॉगिंग पार्क येथे महिलांचा सन्मान करण्यात आला. तर भिंगार टेकडी येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

 संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी सुनिता वराडे, विद्या जोशी, उषा ठोकळ, मिनाक्षी खोगरे, संगीता काळे, साजेदा शेख, वंदना मेहेत्रे, लता गोंधळे, नंदा गायकवाड, आशा नगरे, स्मिता गुंदेचा, रंजना कदम, रत्ना वोनेकर, मोणिका कवडे, सविता दळवी, आरती क्षीरसागर, वैशाली वाघस्कर, सुनंदा बोराडे या महिलांचा सन्मान केला. तर उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सुभाष गोंधळे, रमेश वराडे, अशोक लोंढे, सुधाकर चिदंबर, दिलीप ठोकळ, दिपक बडदे, शंकर भोजल, रामनाथ गर्जे, मनोहर पाडळे, आनंद सदलापुर, सुरेश कानडे, दिलीप गुगळे, विठ्ठल राहिंज, विनोद खोत, दिनेश शहापूरकर, भास्कर भालेराव, रतन मेहेत्रे, दिपक घोडके, विश्‍वास वाघस्कर, सुयोग चेंगडे, राजू कांबळे, रमेश कडूस, राजू काळे, विकास भिंगारदिवे, जालिंद आळकुटे, संपत बेरड, रावसाहेब कोकणे, दिनकर धाडगे, विकास निमसे, अजय खंडागळे, मच्छिंद्र बेरड, सुर्यकांत कटोरे, भिमराव फुंदे, सिध्दू बेरड, अमोल सपकाळ, राजू शेख, विलास निरवणे, संदिप सोनवणे, संजय पतके, शिवाजी लवांडे आदी उपस्थित होते.

संजय सपकाळ म्हणाले की, महिला या समाजाचे व कुटुंबाचे आरोग्य जपत असतात. स्वत:च्या आरोग्याची काळजी न घेता संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी ते आपल्या खांद्यावर पेलवतात. स्त्री हे शक्तीचे प्रतिक असून, त्यांचा समाजात सन्मान झालाच पाहिजे. या भावनेने हरदिन मॉर्निंग ग्रुपने महिलांचा सन्मान केला असून, समाजाच्या आरोग्यासाठी स्वच्छता अभियान देखील राबविल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post