मुंबई (दि.07) : रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्यानंतर येस बँकेचे खातेदार आणि ठेवीदारांची पैसे काढण्यासाठी धावाधाव सुरु आहे. बँकेचे नेट बँकिंग, मोबाइल अॅप, डेबिट आणि क्रेडीट कार्ड, चेक क्लिअरिंग आणि एटीएम सेवा पूर्णपणे खंडीत करण्यात आली आहे. हे कमी कमी की काय तर गुगल पे, फोन पे सारखी इतर मोबाइल वॉलेट्स आणि इतर बँकेच्या एटीएममधून येस बँक खातेदारांना आर्थिक व्यवहार करता येत नसल्याने बँक खातेदारांची पुरती कोंडी झाली आहे. दरम्यान, निर्बंधांनंतर येस बँकेच्या शाखांना पोलीस छावणीचे स्वरूप आले असून प्रत्येक शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
डिजिटल बँकिंग ठप्प झाल्याने ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाऊन तास न् तास रांगेत उभे रहावे लागत आहे. चेक क्लिअरिंग सेवा ठप्प आहे. ग्राहकांनी दुस-या बँकेत येस बँकेचा चेक दिला तो बाऊन्स होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी शाखेतून काउंटरवर पैसे काढणे हिताचे ठरेल, अशी माहिती एका अधिका-याने दिली.
राज्यातील १०९ बँकांना फटका
रिझव्र्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातल्याने या बँकेत ठेवी ठेवणा-या राज्यातील १०९ बँका अडचणीत आल्या असून त्यात विदर्भातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह काही नागरी बँका व काही पत संस्थांचाही समावेश आहे. या बँकांचे सर्व ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले होते. व्यापा-यांनी येस बँकेशी संबंधित धनादेशही स्वीकारण्यास नकार दिल्याने खळबळ उडाली.

Tags:
Maharashtra