नगर (दि.07) : विळदघाटा जवळ मुख्य पाईपलाईन फुटली असून मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरु झाली आहे. शनिवारी दि.7 रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास ही पाईलाईन फुटल्याने आज उपनगर आणि परिसरातील काही भागत पाणीपुरवठा झालेला नाही. या भागात रविवारी दि.8 रोजी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
अमृत योजनेच्या कामांतर्गत पोकलॅन मशिनद्वारे खोदाई करतांना नगर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू झाली आहे. मनपाने तातडीने काम हाती घेऊन पाईपलाईन सुरळीत करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु केले.
केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत जलवाहिनेचे काम सुरू आहे. शनिवारी विळद पंपींग स्टेशनजवळ काम सुरू असतांना सकाळी पोकलॅन मशिनचा धक्का लागून मुख्य जलवाहिनी फुटली आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम मनपाकडून सुरू आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे दुरुस्तीस विलंब होत असून, रात्री उशिरापर्यंत दुरुस्ती पूर्ण होईल, असे मनपाकडून सांगण्यात आले. दरम्यानच्या काळात विळद पंपींग स्टेशन येथून होणारा पाणी उपसा बंद असल्याने शनिवारी बोल्हेगाव, नागापूर, पाईपलाईन रोड, मुकुंदनगर, स्टेशन रोड, बुरूडगाव रोड परिसर व केडगाव उपनगरात पाणीपुरवठा झालेला नाही. या भागात आज (दि.8) नेहमीच्या वेळेत पाणी सोडण्यात येणार असल्याचे मनपाकडून कळविण्यात आले आहे.
Tags:
Ahmednagar
