जयंत पाटलांच्या भाषणावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाची घोषणाबाजी

जयंत पाटलांच्या भाषणावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाची घोषणाबाजी

औरंगाबाद (दि.07) : राष्ट्रवादी काँग्रेसची आज औरंगबादमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या बैठकीला हजर होते. ते भाषण करत असताना अचानक सभागृहात गदारोळ सुरु झाला. त्यांच्या भाषणा दरम्यान काही मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते सभागृहात शिरले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरु केली.  त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

या बैठकीला राज्याचे पाटील हे संबोधित करत असताना त्याठिकाणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात मराठा समाजाला कोणतीही तरतूद नाही, तसेच मागील ४० दिवसांपासून आझाद मैदानात मराठा तरुण आंदोलन करत आहेत. मात्र तिथे एकही मंत्री फिरकलेला नाही, त्यामुळे आता मंत्र्यांना त्यांच्या मतदार संघातही फिरकू देणार नाही, असा पवित्रा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सभागृहातून बाहेर काढत गेटवर सोडले.  त्यानंतर गेटवरही या मराठा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

मुख्यमंत्र्यांनी आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या बोलवून घेतले आणि तीन तास गाडीत ठेवलं. त्यानंतरही मुख्यमंत्री साहेबांनी आंदोलकांची भेट घेतली नाही. याचा अर्थ काय? तुम्ही मराठा समाजाच्या नावावर जिंकून यायचं, सत्ता स्थापन करायची आणि सत्ता स्थापन झाल्यावर दुर्लक्ष करायचं. यापुढे असं कदापी चालणार नाही. आता आम्ही आमदार आणि खासदारांसाठी गावबंदी आणि जिल्हाबंदी करणार आहोत, असे घोषणाबाजी करणारे मराठा कार्यकर्ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post