भातोडी पारगावच्या दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाचा छापा
नगर (दि.05) : नगरमध्ये पावडरचा वापर करुन भेसळयुक्त दूध तयार करण्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी नगर तालुक्यातील भातोडी पारगाव येथील दूध संकलन केंद्रावर छापा टाकून कारवाई करण्यात आल्याने भेसळयुक्त दुधाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे साहायक आयुक्त संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी के. एस. शिंदे, नमूना साहायक प्रशांत कसबेकर यांच्यासह कर्मचार्यांच्या पथकाने गुरुवारी (दि.5) दुपारी नगर तालुक्यातील भातोडी पारगाव येथील हिरामण त्रिंबक शिंदे यांच्या दूध संकलन केंद्रावर छापा टाकून भेसळयुक्त दूध पकडले.
हिरामण शिंदे यांच्या दूध संकलन केंद्रावर व्हे पावडर वापरुन भेसळयुक्त दूध तयार केले जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्याची खात्री करण्यात आल्यानंतर गुरुवारी दुपारी या दूध संकलन केंद्रावर छापा टाकण्यात आला, त्यावेळी तेथे भेसळयुक्त दूध तयार करण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. तसेच या दूध संकलन केंद्रात 23 गोण्या व्हे पावडर व दूध भेसळीसाठी वापरण्यात येणारे इतर रसायन आढळून आले. या केंद्रात सुमारे 750 लि. भेसळयुक्त दूध व इतर साहित्य असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भेसळयुक्त दुधाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. सदरील दूध संकलन केंद्र चालकावर अन्न पदार्थात भेसळ प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे साहायक आयुक्त संजय शिंदे यांनी सांगितले.

Tags:
Ahmednagar