दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली



नगर (दि.05): शहरात दरोड्याच्या तयारीत फिरत असणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेच्या पोलिसांनी बुधवारी रात्री 8.45 च्या सुमारास सावेडी परिसरातील भिस्तबाग महालाजवळ पकडली.


या कारवाईत राजेश बबन देशमुख (वय-24, रा. दत्तनगर, स्टेशन रोड, राहुरी), कंबर रीहम मिर्झा (वय- 31, रा. मदर तेरेसा सर्कल, कॉलेज रोड, वॉर्ड नं.1, श्रीरामपुर), जफर मुक्तार शेख (वय-29, रा. वॉर्ड नं.2, सुभेदार वस्ती, श्रीरामपुर), जाकीर उर्फ जग्या युनुस खान (वय-25, रा. इराणी गल्ली, श्रीरामपुर), अनिल रावसाहेब चव्हाण (वय-20, रा. दत्तनगर, स्टेशन रोड, राहुरी) यांना अटक केली. त्यांच्याकडील सत्तुर, चाकु, लाकडी दांडके, 5 मोबाईल व एक होंडासिटी कार (एम.एच.02, बी.ई.डी. 3085) असा 2 लाख 51 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

कॉटेज कॉर्नर ते भिस्तबाग महाल रोडने शहरात कुठेतरी दरोडा टाकण्यासाठी पाच जणांची टोळी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शन व सूचनेवरुन पोलिसांनी भिस्तबाग महालाजवळ सापळा रचला व संशयीत कार येताच पोलिसांनी त्यावर छापा टाकून आतील पाच जणांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील स.पो.नि. देशमुख, हे.कॉ. मनोहर गोसावी, पो.ना.रविंद्र कर्डिले, सुरेश माळी, पो.कॉ. रणजित जाधव, चालक हे.कॉ. संभाजी कोतकर यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post